Jintur News : दुष्काळामुळे पीक जळून गेल्याने आर्थिक विवंचनेत युवा शेतकऱ्याने संपविले जीवन; जिंतूर तालुक्यातील घटना

जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथील पवन बेंद्रे या युवा शेतकऱ्याने शनिवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना उघडकीस आली.
Pawan bendre

Pawan bendre

sakal

Updated on: 

जिंतूर - तालुक्यातील भोगाव देवी येथील पवन मुरलीधर बेंद्रे (वय-२८) या युवा शेतकऱ्याने शनिवारी (ता. १०) दुपारी तीनच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना उघडकीस आली.

यंदा पावसाने ओढ दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची परिसरात चर्चा आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com