पालावरील भटक्यांसाठी प्रशासनाची अशीही कामगिरी

javlagavkar.jpg
javlagavkar.jpg


निवघाबाजार, (ता. हदगाव, जि. नांदेड) ः उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत कार्यालय निवघाबाजार आणि तलाठी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या समाजातील वैदू, वडार, पारधी आणि चुडबुडके या समाजांना विविध प्रमाणपत्रांअभावी हा समाज शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत असल्याची बाब उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या भटक्या समाजाला विविध प्रमाणपत्र मिळून देण्याकरिता मागील दोन महिन्यांपासून ग्रामपंचायतीपासून महसूल विभागाची यंत्रना कामाला लावली अन् निवघा येथे तीन हजार वस्ती असलेल्या वैदूवाडीत ‘वंचित समाज सक्षमीकरण विशेष शिबिरा’चे दोन दिवसांचे आयोजन करून हे शिबिर दोन दिवस चालले. 


या दोन दिवसांच्या शिबिरात ४७१ जणांना विविध प्रमाणपत्रांचे आमदार माधवराव पाटील यांच्या हस्ते (ता.२०) जानेवारी रोजी वाटप करण्यात आले. यामुळे वैदू, वडार, पारधी, चुडबुडके समाज आनंदी झाला आहे. निवघा येथील वैदू समाज हा सतत पोटाची खळगी भरण्याकरिता बाहेरगावी असतात. यामुळे या समाजाच्या मुलांचे शिक्षण होत नाही. जर एखाद्या मुलाचे शिक्षण झालेच, तर त्यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्याने त्यांना नौकरीपासून वंचित राहावे लागत आहे.
वीस वर्षांपूर्वी जातीचे प्रमाणपत्र काढण्याकरिता मी किनवट येथे गेलो होतो; पण अपूर्ण कागदपत्र असल्याने एक-दोन वेळा मी प्रयत्न केला. परंतु, जातीच्या प्रमाणपत्राचे काम झालेच नाही. यामुळे प्रमाणपत्र काढण्याचा नाद सोडून दिला अन्‌ काम करण्यासाठी बाहेरगावी गेलो. पण आतापर्यंत एकाही अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला नाही. आताचे उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी प्रयत्न करून एकाच दिवसी माझे व माझ्या मुलांचे जातीचे प्रमाणपत्र मिळावून  दिल्याने मी खूप आनंदी असल्याचे गणपत शिवरकर यांनी सांगितले.

हेही वाचा-  टिईटीच्या परीक्षेत परीक्षा परिषदच नापास ! ​
माझे शिक्षण एम.ए., डीएड झाले; पण जातीच्या प्रमाणपत्राअभावी मी नौकरीपासून वंचित राहिल्याने मला पारंपरिक चाळणी, डब्बे बनविण्याचा व्यवसाय करावा लागत असल्याने मी एवढा शिकून व्यवसाय करतो. मग शिकून काय फायदा? अशी नकारात्मक मानसिकता वैदू समाजाची बनली आहे, अशी प्रतिक्रिया नाना अंभोरे यांनी व्यक्त केली. ‘वंचित समाज सक्षमीकरण विशेष शिबिर’ थेट वैदूवाडीत होते. या मुळे तहसील आपल्या दारी आल्यासारखे वाटत होते. या शिबिरात श्रावणबाळ योजना घरकुल, आयुषमान भारत योजना, आधारकार्ड, मतदान कार्ड, जातीचे प्रमाणपत्र असे विविध विभाग स्थापन करून दोन दिवसांत जवळपास सर्वच लाभार्थींना काही ना काही प्रमाणपत्रांचा लाभ मिळाला. हा कार्यक्रम घडवून आणण्यास उपसरपंच संदीप पाटील, ग्रांमपंचायत सदस्य साहेबराव माटाळकर यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, तहसीलदार जीवराज दापकर, येरावार, भास्करराव पाटील, तलाठी तावडे, बालाजी कानडे आदींसह विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com