esakal | हिंगोली जिल्ह्यातील सर्व बँकांची विड्रॉल सुविधा पूर्ववत सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

SBI

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील बँकांची विड्रॉल (पैसे काढण्याची सुविधा) सुविधा जिल्हा प्रशासनामार्फत बंद करण्यात आली होती. परंतू मंगळवारपासून (ता.२५) जिल्ह्यातील सर्व बँकांची विड्रॉल सुविधा पूर्ववत सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व बँकांची विड्रॉल सुविधा पूर्ववत सुरु

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील बँकांची विड्रॉल (पैसे काढण्याची सुविधा) सुविधा जिल्हा प्रशासनामार्फत बंद करण्यात आली होती. परंतू मंगळवारपासून (ता.२५) जिल्ह्यातील सर्व बँकांची विड्रॉल सुविधा पूर्ववत सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अग्रणी बँक व सर्व बँकांचे व्यवस्थापक यांनी दिलेल्या सूचनेनुसार बँक परिसरात सर्व संबंधितांना आणि नागरिकांना सामाजिक अंतरांचे पालन करणे, तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे.

या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला हा अपराध केला आहे, असे मानण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ नुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, बँकेत विड्राँल सुविधा उपलब्ध नसल्याने तसेच सणासुदीचे दिवस असल्याने बँकेच्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत होती. सलग आलेल्या सुट्टया, एटीएमवर होणारी गर्दी यामुळे अडचणी येत होत्या. दोन दिवसाच्या सुट्यानंतर सोमवारी सुरू झालेल्या बँकेत ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. संचारबंदी शिथिल झाल्यापासून गेली चार दिवसांपासून शहरातील सर्वच बँकेत नागरिकांनी ऐन सणासुदीच्या काळात गर्दी केल्याचे चित्र होते. सामाजिक अंतर राखण्याचे भान देखील नागरिकांनी विसरल्याचे दिसून येते.

लॉकडाऊन काळात सर्व बँकेचे व्यवहारही ठप्प झाले होते. मात्र, आता हिंगोली जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन कालावधी संपल्याने  शेतकरी हे अर्धवट राहिलेली बँकेची कामे त्याचबरोबर बँकेतून रक्कम काढण्यासाठी सोमवारी दिवसभर लांबच लांब रांगा लावून पैसे काढण्यासाठी ताटकळत उभे राहिले आहेत. मात्र शेवटचा क्रमांक येईपर्यंत बँकेचे व्यवहार बंद होत असल्याने शेतकऱ्याला आल्या पावली परत जाण्याची वेळ आली होती. शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँक, भारतीय स्टेट बँक, आयडीबीआय, युनियन बँक, महाराष्ट्र बँक आदी बँकेत सोमवारी रोखीचे व्यवहार करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. 

जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असताना देखील कोरोनाची भीती विसरून की काय पुन्हा शेतकरी सामाजिक अंतर न पाळता, तोंडाला मास्क न लावता गर्दी केल्याचे दिसून येत होते. सणासुदीचे दिवस असल्याने प्रत्येक जण शहरी भागात धाव घेत आहेत, तर कोरोना कालावधीमध्ये राहिलेली खरेदी आता पूर्ण करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांसह नागरिक करत आहेत. मात्र, बँकेची व्यवस्था बंद असल्याने शेतकर्‍यांना मोठा फटका सहन करावा लागत होता. ही परिस्थिती शेतकऱ्याची नव्हे तर नागरिकांना देखील त्याचा फटका बसत होता. याचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वच बॅंकांची विड्राॅल सुविधा सुरु केली आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top