Illegal Mining Tragedy: टेंभापुरी अवैध उत्खनन दुर्घटना: तीन तरुणांच्या मृत्यूनंतर उपजिल्हाधिकाऱ्यांची पाहणी

टेंभापुरी मध्यम प्रकल्पातील अवैध मुरूम उत्खननामुळे झालेल्या तिहेरी मृत्यूकांडानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांची गुप्त पाहणी; ठोस कारवाईबाबत मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह
Tembhapuri Tragedy: District Administration Finally Wakes Up After 3 Youth Drown

Tembhapuri Tragedy: District Administration Finally Wakes Up After 3 Youth Drown

Sakal

Updated on

शेंदूरवादा : गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी मध्यम प्रकल्पात शुक्रवारी (ता. १) दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास अवैध मुरूम उत्खननामुळे तयार झालेल्या खोल खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांनी रविवारी (ता. ३) घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com