Beed News : बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या कामाची गती, विमानतळाच्या स्थळ पाहणीसह सीएससी सेंटरला अचानक भेट
Vivek Johnson: जिल्हा अधिकारी विवेक जॉन्सन यांनी रविवारची सुट्टी असूनही बीड जिल्ह्यातील नियोजित विमानतळ व विविध सीएससी केंद्रांची पाहणी केली. शासकीय सेवा व योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली.
बीड : जिल्ह्यात नुकतेच पदभार स्वीकारलेले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी कामाचा झपाटा सुरूच ठेवला आहे. रविवारची सुट्टी असूनही त्यांनी सकाळी १० वाजेपासून अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह विविध ठिकाणी थेट भेटी देत कामाचा आढावा घेतला.