beed collector vivek johnson
sakal
- नितीन चव्हाण
बीड - शालेय पोषण आहारात कोणतीही कमतरता आढळली तर गाठ माझ्याशी आहे असा कडक इशारा आठवड्याभरापूर्वी महिला व बालविकास विभागाच्या बैठकीत देणारे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मंगळवारी (ता. ६) स्वतः मैदानात उतरून त्याचा थेट प्रत्यय आणून दिला. दुष्काळी पाहणी दौऱ्यावर असताना त्यांनी अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळआंबा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला अचानक भेट देऊन पोषण आहाराची थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत बसून कसून पाहणी केली.