‘या’ जिल्ह्यात तीन सभापती सेनेचे तर प्रत्येकी एक भाजप, कॉँग्रेसचा 

19 new
19 new

हिंगोली ः जिल्‍ह्यात पाच पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींची निवड सोमवारी (ता.३०) पार पडली. यात हिंगोली, सेनगाव, औंढ्यात सेना, वसमत येथे भाजप तर कळमनुरीत कॉँग्रेसला सभापतीपद मिळाले आहे. त्‍यांच्या निवडीनंतर नविनर्वाचितांचा सत्‍कार करून जल्‍लोष करण्यात आला. 


जिल्‍ह्यात मागील काळात मार्च २०१७ मध्ये पंचायत समिती सभापती व उपसभापतीच्या निवडी झाल्या होत्या. त्‍याची मुदत सप्टेंबर महिण्यात संपणार होती. त्‍यानंतर विधानसभा निवडणुकीमुळे मुदतवाढ मिळाल्याने डिसेंबर महिण्यात ही मुदत (ता.२०) संपली. त्‍यांनतर शनिवारी (ता.२१) जिल्‍हा प्रशासनाने निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्‍याप्रमाणे सोमवारी सभापती, उपसभापती पदाची निवड प्रक्रीया पार पडली. 

औंढ्यात शिवसेनच्या संगीता ढेकळे सभापती 
औंढा नागनाथ येथील पंचायत समिती सभापतीसाठी शिवसेनेकडून संगीता ईश्वर ढेकळे, माया अविनाश कऱ्हाळे यांनी फॉर्म दाखल केले होते. तर उपसभापतीसाठी शिवसेनेकडून भिमराव कऱ्हाळे, सुरेश कुंडकर यांनी फॉर्म भरले होते. हात उंचावून मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यात सभापतीच्या निवडीत संगीता ढेकळे यांना सोळा तर माया कऱ्हाळे यांना दोन मते पडली. उपसभापतीसाठी भिमराव कऱ्हाळे यांना पंधरा तर सुरेश कुंडकर यांना तीन मते पडले. यामुळे पिठासन अधिकारी तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी सभापती म्‍हणून संगीता ढकळे व उपसभापती भिमराव कऱ्हाळे यांची निवड झाल्याचे जाहीर केले.  

हिंगोलीत सेनेच्या सुमन झुळझुळे सभापती
हिंगोली येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या सुमन झुळझुळे तर उपसभापतीपदी कॉँग्रेसच्या गंगाबाई गावंडे यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी भाजपचे तीन सदस्य गैरहजर होते. निवडीनंतर नवनिर्वाचितांचा सत्‍कार करण्यात आला. पिठासीन अधिकारी तहसीलदार गजानन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. या वेळी मागील फॉर्म्युला राबवित महाघाडीच्या मदतीने शिवसेनेने भगवा फडकवला. सभापतीपदी सेनेच्या सुमनबाई झुळझुळे तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या गंगाबाई गावंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. श्री.शिंदे यांनी दोघांची ही बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्‍यानंतर कार्यकर्त्यांनी जल्‍लोष केला. 

वसमत येथे भाजपच्या ज्‍योती धोसे सभापती
वसमत येथे भारतीय जनता पार्टीचे निर्विवाद वर्चस्‍व असलेल्‍या पंचायत समितीच्‍या सभापतीपदी ज्‍योतीताई धोसे यांची तर उपसभापतीपदी विजय नरवाडे यांची झाली. पंचायत समितीच्‍या सभागृहात पिठासिन अधिकारी तहसिलदार ज्‍योती पवार यांच्‍या उपस्‍थितीत सदस्‍यांची बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी भाजपच्‍या सुकळी गणातील सदस्‍या ज्‍योतीताई विश्‍वनाथराव धोसे यांची सभापतीपदी तर पार्डी गणाचे सदस्‍य विजय अण्णाराव नरवाडे यांची उपसभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा पंचायत समितीच्‍या वतीने सत्‍कार करण्यात आला. 

सेनगावात सेनेच्या छाया हेंबाडे सभापती
सेनगाव येथे झालेल्या सभापती व उसभापतीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचा फॉम्‍युला राबवत शिवसेनेच्या छाया हेंबाडे तर राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या अरुणा गडदे यांची उपसभापतीपती निवड झाली. निवडीनंतर नवनिर्वाचितांचा सत्‍कार करण्यात आला. पिठासन अधिकारी म्‍हणून जीवकुमार कांबळे यांनी काम पाहिले. दरम्यान, काँग्रेसच्या चार सदस्यांनी बंड करीत भाजपासोबत सत्तास्थापनेसाठी केलेला प्रयत्न यशस्वी ठरला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com