

SDM’s externment order cancelled by Divisional Commissioner.
sakal
Maharashtra Governance : इतर सामान्य गुन्ह्यांमध्ये जर हद्दपार करण्याचा आदेश दिला असेल, तर तो कायदा आणि न्याय यांच्या कसोटीवर टिकत नाही. अशाच एका प्रकरणात विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी, लातूर जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम), अहमदपूर यांनी दिलेला हद्दपारीचा आदेश रद्दबातल ठरवला आहे.