esakal | Diwali 2020 : कोरोनाच्या काळात नाविन्यपूर्ण विषय घेऊन दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Aank

कोरोनामुळे राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. वाहतूक बंद, माणसाच्या हालचालींना मर्यादा आल्या होत्या. यात दिवाळी अंक काढायचा की नाही याची चर्चा प्रकाशकांमध्ये सुरू होती. काहींनी दिवाळी अंक ई-स्वरूपात प्रसिद्ध करण्याचे निश्‍चित केले होते.

Diwali 2020 : कोरोनाच्या काळात नाविन्यपूर्ण विषय घेऊन दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला

sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद : कोरोनामुळे राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. वाहतूक बंद, माणसाच्या हालचालींना मर्यादा आल्या होत्या. यात दिवाळी अंक काढायचा की नाही याची चर्चा प्रकाशकांमध्ये सुरू होती. काहींनी दिवाळी अंक ई-स्वरूपात प्रसिद्ध करण्याचे निश्‍चित केले होते. दिवाळी अंकांची महाराष्ट्र राज्यात शंभर वर्षांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. ती यंदा खंडित होते की काय अशी स्थिती होती. मात्र, हळूहळू अनेक गोष्टी शासनाने अनलॉक सुरू करायला सुरवात केली आणि दिवाळी अंक निघणार हे निश्‍चित झाले.

औरंगाबाद येथील पासपोर्ट कार्यालय लवकरच होणार सुरू, नागरिकांची होणार सोय

कोरोनामुळे या अंकांच्या अर्थकारणावरून परिणाम झालेला दिसतो. त्यामुळे प्रकाशकांनी मर्यादित अंक प्रसिद्ध केले आहेत. यंदाच्या प्रमुख दिवाळी अंकांमध्ये कोरोनावरील लेख वाचकांना वाचायला मिळणार आहेत. शब्दालय प्रकाशनगृहाने दिवाळी अंकांची मेजवानी या उपक्रमाअंतर्गत सवलतीच्या दरामध्ये काही प्रमुख दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. तसेच ग्रंथालीने दिवाळी अंकांच्या संचाची योजना आखली आहे. त्याचाही फायदा वाचक रसिकांना मिळेल. बालकुमार व युवा दिवाळी अंकांसाठी प्रकाशनपूर्व सवलत नोंदणी मोहीम राबवता आली नाही. परिणाम, मागील बारा वर्षे सरासरी अडीच लाख प्रतींची विक्री होत आलेला बालकुमार अंक यावर्षी फक्त वीस हजार प्रती काढला आणि मागील सहा वर्षे सरासरी चाळीस हजार प्रतींची विक्री होत आलेला तो युवा अंक या वर्षी फक्त दहा हजार प्रती काढला, असे साधनाच्या दिवाळी अंकाच्या संपादकीयमध्ये संपादक विनोद शिरसाठ लिहितात.

दर्जेदार अंक वाचकांच्या भेटीला
पद्मगंधाच्या दिवाळी अंकात प्रतिभा आणि कलानिर्मिती हा विशेष अभ्यास विभाग आहे; तसेच उत्तम अनुवादाचा यंदाचा आपत्ती काळातील साहित्य हा विशेषांक आहे. मिळून साऱ्याजणीमध्ये यंदा विनोद या विषयावर विशेष विभाग आहे. दुसरीकडे बच्चे कंपनीसाठी पासवर्ड, साधनाबालकुमार व किशोर या दिवाळी अंक विविध विषय घेऊन आले आहेत. यासह अनेक अंक बाजारात आले आहेत. प्रत्येकात नवीन विषय वाचायला वाचकांना मिळेल.

दिवाळी अंक कमी प्रसिद्ध झाले आहेत. म्हणावा असा चांगला प्रतिसाद वाचकांकडून मिळालेला नाही.
-केतन शहा, औरंगाबाद बुक डेपो

दिवाळी अंकांबाबत चांगला अनुभव आहे. अंक इतरांनाही वाचायलाही सांगतो.
-अविनाश देशमुख, वाचक