
धाराशिव : सध्या सगळीकडे लग्नसराईचा माहोल आहे. शहरातही ठिकठिकाणी नवरदेवाच्या वराती निघत आहेत. या वरातीत डीजेच्या दणदणाटात नवरदेवाचे मित्र, वऱ्हाडी थिरकत आहेत. मात्र, डीजेच्या धडकी भरविणाऱ्या आवाजाने नागरिकांना मानसिक; तसेच शारीरिक त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ‘डीजेवाले दादा वाजीव, पण जरा कमी आवाजात...’ असे सांगण्याची गरज निर्माण झाली आहे.