mla vilas bhumre
sakal
पाचोड - जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले असले, तरी अनेक शेतकऱ्यांना पाणी परवाना नसल्यामुळे सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. एकीकडे दुष्काळाचे सावट, दुसरीकडे पिके जगविण्याची धडपड आणि त्यातच पाणी परवाना नसलेल्या शेतकऱ्यांच्या पाटबंधारे विभागाकडून मोटारी जप्त करून दंड आकारण्याची कारवाई सुरू असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.