esakal | जिल्ह्याची कोरोना बाधित संख्या नियंत्रणात तरी योग्य नियोजन करा, कोण म्हणाले वाचा... 
sakal

बोलून बातमी शोधा

bhet

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हिंगोलीत सोमवारी आढावा बैठक घेतली. 

जिल्ह्याची कोरोना बाधित संख्या नियंत्रणात तरी योग्य नियोजन करा, कोण म्हणाले वाचा... 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : दिवसेंदिवस कोरेानाचा प्रादुर्भाव वाढत असून, येणाऱ्या कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. १३) आयोजित आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धन्वंतकुमार माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या तक्रारी ठरल्या खऱ्या, सोयाबीन बियाणाची उगवण क्षमताच नसल्याचे उघडे...

प्राथमिक उपचार कक्षात ऑक्सिजनची सुविधा द्या 
या वेळी श्री. केंद्रेकर म्हणाले, मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा हिंगोली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली, तरी येणाऱ्या कालावधीत कोरोनाचे संकट वाढण्याचे संकेत असल्याने रुग्णाची संख्यादेखील वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे. कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता अतिमहत्त्वाची असल्याने रुग्ण रुग्णालयात दाखल होताच त्यास ऑक्सिजन मिळावे, यासाठी प्राथमिक उपचार कक्षात ऑक्सिजनची सुविधेसह तीन ते चार खाटांची सुविधा असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधील ३५० खाटांची संख्या ही किमान दोन हजार खाटांपर्यंत वाढवावी. ज्या व्यक्तींना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार इत्यादी व्याधी आहे अशा व्यक्तींची माहिती तयार करावी. बाधित, संशयित रुग्णास होम क्वारंटाइन न करता संस्थात्मक क्वारंटाइनमध्येच ठेवावे. 

हेही वाचा - ‘एचएआरसी’ने धावले दोनशे वंचित बालकांच्या शैक्षणिक मदतीला... -

सोयाबीन बियाणांचे नमुने घेऊन तपासणी करावी
ज्या शेतातील बियाणांची उगवण झाली नाही अशा बियाणांचे नमुने घेऊन तपासणी करावी; तसेच ज्या कंपनीचे बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याने उगवण झाली नाही अशा कंपनीच्या मालकांवर गुन्हे दाखल करा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्याला मंजूर झालेल्या सहाशे विहिरींचा आढावा घेतला; तसेच पर्यावरणांचे संतुलन राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालये, रस्त्यांच्या दुतर्फा, वनविभागाच्या जागेवर आणि माळरानावरील टेकड्यांवर वृक्षारोपण करावे, असे ते म्हणाले. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेऊन जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. केंद्रेकर यांनी केले. परिषद परिसरात केलेली वृक्षलागवडीची पाहणी केली. जिल्हा रुग्णालयातील उपचाराकरिता भरती असलेल्या रुग्णांची भेट घेतली. 

जिल्हा रुग्णालयास आयुक्त केंद्रेकर यांची भेट 
हिंगोली : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे हिंगोली दौऱ्यावर आले असता, त्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देत तेथील आरोग्यविषयक बाबींची तपासणी केली. जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्यामध्ये महाराष्ट्रात पहिला क्रमांक आल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा व आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. औंढा रोडवरील नव्याने उभारण्यात आलेल्या जिल्हा कोरोना रुग्णालय येथे भेट दिली. तेथे संपूर्ण वॉर्डनिहाय पाहणी केली. जिल्हा कोरोना रुग्णालय येथे दर्शनीय भागात कोरोना आजाराबाबत लावलेली माहिती प्रत्यक्ष पाहून कौतुक केले. येथील आयसोलेशन वॉर्डास भेट दिली. तेथील असलेल्या रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधला व रुग्णांचे मनोधैर्य वाढविले व तेथील स्वच्छतेची पाहणी केली. स्वच्छतेबद्दल समाधान व्यक्त केले; तसेच रुग्णांच्या आहाराबाबत सांगितले व औषधी उपलब्ध करून घेण्याबदल सूचना दिल्या. तेथे काम करणाऱ्या सिस्टरचे कौतुक केले, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. 
जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना व प्रसिद्धी, जनजागृतीबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांचे कौतुक केले. 

(संपादन ः राजन मंगरुळकर)

loading image