
परळी वैजनाथ : शहरातील कृष्णा टॉकीज परिसरातील एका डॉक्टरने युवतीचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल झाल्याने डॉक्टरवर विनयभंगासह ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याची नोंद झाली. याप्रकरणी संबंधित डॉक्टरच्या अटकेसाठी आंबेडकरी चळवळीच्या वतीने शहरात शनिवारी बंदचे आवाहन केले होते. यास व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. दुपारनंतर बाजारपेठ सुरळीत झाली.