कुत्र्याला कळले स्वच्छतेचे महत्त्व; घंटागाडी येताच घेऊन जातो कचऱ्याचा डब्बा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

सध्या देशात स्वच्छता अभियान मोठ्या वेगाने राबवले जात असतानाच लातूरमधील गोकुळधाम सोसायटीत एका चिंटू नामक कुत्रा दररोज सकाळी घंटागाडीचा आवाज ऐकताच घरातून कचऱ्याचा डब्बा घेऊन घंटागाडीत आणून देत असल्याने स्वच्छतेचे महत्त्व जाणणारा चिंटू नामक कुत्र्याचीच सध्या लातूरमध्ये जोरदार चालू आहे.

लातूर : सध्या देशात स्वच्छता अभियान मोठ्या वेगाने राबवले जात असतानाच लातूरमधील गोकुळधाम सोसायटीत एका चिंटू नामक कुत्रा दररोज सकाळी घंटागाडीचा आवाज ऐकताच घरातून कचऱ्याचा डब्बा घेऊन घंटागाडीत आणून देत असल्याने स्वच्छतेचे महत्त्व जाणणारा चिंटू नामक कुत्र्याचीच सध्या लातूरमध्ये जोरदार चालू आहे.

लातूर शहरात घाणीचे साम्राज्य मोठे असल्याची स्थिती आहे. दरम्यान, देशात स्वच्छता अभियान जोरात राबविण्यास सुरुवात झाली आहे. लातूर मनपाच्या वतीने दररोज स्वच्छतेचे गीत गात घंटागाडी फिरत असते.

शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील गोकुळधाम सोसायटीतील 5 वर्षापासून येथील रहिवासी असलेले वंदना शिलेदार यांच्या घरातील चिंटू नामक कुत्रा हा दररोज सकाळी लातूर मनपाची घंटागाडी आली कि घरात कचऱ्याचा डब्बा शोधून घंटागाडीकडे धाव घेतो अन स्वच्छता कर्मचाऱ्यांना सोपवतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dog realized the importance of Cleanliness in latur

टॅग्स