Beed News: हॉटेल मालकांना दिलासा,; पण सर्वसामान्यांचे काय?; ग्राहकांशी अरेरावी आणि उर्मट उत्तरे; एजन्सींवर वचक गरजेचा

Rude Behavior and Customer Complaints: बीड शहरातील घरगुती गॅस ग्राहकांना एजन्सींच्या मनमानी व अरेरावीचा सामना करावा लागत आहे. प्रशासन ढिम्म असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: उन्हाळ्याच्या झळांनी तशीही अंगाची लाहीलाही होत आहे, पण शहरातील घरगुती गॅस ग्राहकांसाठी गॅस एजन्सीच्या पायऱ्या चढणे हा उन्हापेक्षाही दाहक अनुभव ठरू लागला आहे. जिल्ह्यात व्यावसायिक सिलिंडरचा ४० टक्के पुरवठा सुरू झाल्याने हॉटेल व्यावसायिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला, तरी दुसरीकडे घरातील चूल पेटवण्यासाठी धडपडणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना मात्र गॅस एजन्सीच्या मनमानीचा आणि अरेरावीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाचा वचक राहिला नसल्याने की काय, अशी भीती वाटण्यासारखी परिस्थिती आज बीड शहरात निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com