Competitive Exam Success Story: जिद्द, चिकाटी अन् मेहनतीला यशाची साथ; तीन माजी विद्यार्थ्यांची यशाला गवसणी, जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा

Dongav ZP School Alumni Achieve Remarkable Success In Government Jobs: ग्रामीण भागातील डोणगाव जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांत घवघवीत यश मिळवत महसूल सहायक, आयकर निरीक्षक आणि मेडिकल रेडिओलॉजी टेक्निशियन पदांवर मजल मारत गावाचे नाव उज्ज्वल केले
Rural Maharashtra School Success Story Three Dongav ZP School Alumni Achieve Remarkable Success In Government Service Careers

Rural Maharashtra School Success Story Three Dongav ZP School Alumni Achieve Remarkable Success In Government Service Careers

esakal

Updated on: 

-हबीबखान पठाण

पाचोड: जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्पर्धेच्या युगात मोठे यश संपादन करत असून डोणगाव तांबे (ता.पैठण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी हे सिद्ध करून दाखविले आहे. या शाळेच्या माजी विद्यार्थिनी वंदना बाबासाहेब तांबे यांची महसूल सहायकपदी, उज्वला तातेराव तांबे यांची केंद्रीय आयकर विभागात आयकर निरीक्षकपदी, तर दीपक पांडुरंग तांबे यांची मेडिकल रेडिओलॉजी व इमेजिंग टेक्निशियन म्हणून निवड झाली आहे. या तिन्ही गुणवंत माजी विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा रविवारी (ता.२७) भव्य सत्कार करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com