Pre Sowing Tips : जमिनीत वाफसा असल्यास; पूर्वमशागतीची कामे करावीत कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा सल्ला
Marathwada Weather : मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असून, पेरणीची घाई न करता पूर्व मशागतीची कामे पूर्ण करावीत, असा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे.
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेने आगामी आठवड्याचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. प्राप्त माहितीनुसार, पुढील आठवड्यात मराठवाडा विभागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.