पीरबावडा येथील जिल्हा बँक शाखेचे स्थलांतर करू नका

बाबासाहेब ठोंबरे
सोमवार, 18 जून 2018

पीरबावडा (औरंगाबाद) : पीरबावडा (ता.फुलंब्री) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा इतरत्र स्थलांतर करू नये असा ठराव पीरबावडा ग्रामपंचायतीने 1 डिसेंबर 2017 रोजी घेतला असून शाखा स्थलांतरीत करू नये अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था औरंगाबाद यांच्याकडे केली आहे. बँकेसाठी 18 जून रोजी ग्रामस्थांच्या वतीने भव्य रास्तारोको करण्यात येणार आहे.

पीरबावडा येथे असलेली जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखेला परिसरातील मारसावळी, गीरसावळी, आडगाव, रांजणगाव, गेवराई, टाकळी, धानोरा आदी गावे या बँकेला जोडलेले आहे. ग्रामपंचायत ठरावात म्हटले आहे की, सदरील बँक आताच्या ठिकाणी योग्य असून सर्व सुविधा उपलब्ध आहे. तसेच सदरील शाखा मुख्य बसस्टॉपवर असून सर्व वाहने या ठिकाणी थांबतात व वयोवृध्द, अपंग, निराधार यांना सोईचे असून सर्व शासकीय अनुदान या शाखेत जमा होते. त्याचबरोबर परिसरातील इतर गावामधून येणाऱ्या खातेधारकांना सुद्धा ही शाखा सोईस्कर असून ग्रामस्थ, अपंग, वयोवृद्ध व लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही. अशी मागणी ग्रामस्थांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था औरंगाबाद  यांच्याकडे केली आहे.

18 जूनला रास्ता रोको
सदरील शाखा स्थलांतरास विरोध करण्यासाठी 18 जून सोमवारी रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार फुलंब्री, पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांना ग्रामस्थांच्या वतीने (ता.15) देण्यात आले. ठोस आश्वासन मिळेपर्यंत रास्ता रोको करण्यात येईल. व कुठल्याही परिस्थितीत शाखा स्थलांतरित होऊ देणार नाही असे निवेदनात म्हटले आहे. 

सदर बँकेची शाखा ही अनेक वर्षापासून गावात असून प्रशस्त इमारत असून परिसरातील  गावातून येणाऱ्या खातेधारकांना  सोयीची आहे. बँक स्थलांतरणास आमचा ग्रामस्थांचा विरोध असून यासाठी मोठे जनआंदोलन उभारू परंतु शाखा स्थलांतर होऊ देणार नाही.
- लिलाबाई संजय काळे, सरपंच पिरबावडा

Web Title: dont shift pirwada district bank