Manoj Jarangesakal
मराठवाडा
Manoj Jarange : मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे की संयमाचा अंत पाहू नका. ३० एप्रिलनंतर आंदोलन पुन्हा सुरू करण्याची चेतावणी त्यांनी दिली आहे.
शहागड : मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, मराठ्यांचा संयम सुटल्यास मुख्यमंत्री जबाबदार राहतील, दोन वर्षांपासून आम्ही आरक्षणासंदर्भात आंदोलन करत असून ३० एप्रिलपर्यंत जी मुदत आपण मागितली होती ती संपत असून, पुन्हा आंदोलन करण्यास करण्यास भाग पाडू नका, असा निरोप मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री उदय सामंतांमार्फत सरकारला पाठवला आहे.