Unseasonal Rain : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने धारूर तालुक्याला झोडपले; काढणीस आलेला रब्बी हंगाम आडवा

धारूर तालुका परिसरात (ता.२३) रोजी दुपारी दोन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला.
Agriculture Loss By Unseasonal Rain

Agriculture Loss By Unseasonal Rain

sakal

Updated on

किल्लेधारूर - धारूर तालुका परिसरात (ता.२३) रोजी दुपारी दोन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीस आलेली पिके मोठ्या प्रमाणावर जमीनदोस्त झाली आहेत. गहू, हरभरा, ज्वारी, मोहर आदी पिके आडवी पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी आंब्याच्या बागांनाही फटका बसला असून मोहोर गळून पडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com