A female farmer from Parundi Tanda was weeping bitterly due to the damage to her onion crop.
sakal
आडूळ - आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडलेला असताना आता वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडत आहे. पैठण तालुक्यातील पारुंडी तांडा येथील गट क्रमांक १३९ मधील दोन महिला शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या कांदा पिकाची नीलगायींच्या कळपाने मोठ्या प्रमाणावर नासधूस केली.