Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : उमरग्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उसळली गर्दी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त पालिके समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष, संघटना आणि आंबेडकर प्रेमींनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
Baba patil
Baba patilsakal

उमरगा - विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त रविवारी (ता. १४) सकाळपासून पालिके समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष, संघटना आणि आंबेडकर प्रेमींनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

प्रारंभी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे तर, जयंती समितीचे अध्यक्ष श्रीधर सरपे यांच्या हस्ते निळ्या झेंड्याचे वंदन करण्यात आले. बौधाचार्य मिलिंद डोईबळे, धम्मचारी विबोध,धम्ममित्र शाक्यदीप कांबळे,जी.एल.कांबळे, फुलचंद कांबळे यांनी बुद्ध पूजा घेतली. समता सैनिक दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली.

आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, युवा नेते किरण गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्लेष मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अँड. अभयराजे चालुक्य, माजी समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे, माजी सदस्य दिलीप भालेराव, नो चँलेज ग्रुपचे अध्यक्ष विजय वाघमारे, अँड. सुभाष राजोळे, संजय चालुक्य, एम. ओ. पाटील, विजय दळगडे, अँड. अशोक पोतदार, जेष्ठ नेते हरिष डावरे, सतिश सुरवसे, मधुकर बिद्री, बाबा मस्के, विक्रम मस्के, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, भाजपा तालुकाध्यक्ष शहाजी पाटील, माधव पवार, डॉ. शौकत पटेल, योगेश तपसाळे, शरद पवार, सचिन जाधव, संदीप चौगुले, सुवर्णा भालेराव, राहुल सरपे, पालिकेचे कार्यालयिन अधीक्षक तुळशीदास वऱ्हाडे, अजय सरपे, कमलाकर सूर्यवंशी, अभिमन्यू भोसले, सुशिल दळगडे, महेश माशाळकर, दत्ता रोंगे, मुस्लिम कमिटीचे बाबा औटी, याकूब लदाफ, शिवसेना उबठाचे तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे, मराठा सेवा संघाचे अनिल सगर, प्रा. किरण सगर, दिगंबर भालेराव, धीरज बेळंबकर, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अँड. जी. के. गायकवाड, अँड. व्ही. एस. आळंगे, अँड. मल्हारी बनसोडे, अँड. हिराजी पांढरे, उमाजी गायकवाड, सुभाष काळे, अँड. एस.पी. इनामदार आदींनी डॉ. बाबासाहेबाच्या पुतळ्याला अभिवादन केले.

भीम गीताच्या माध्यमातून अभिवादन

वंदना कला पथक, गीत गुंजन कलापथक लातूर यांच्या दिवसभर भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अशोक कलापथक कलदेव निंबाळा, गुणरत्न कलापथक उमरगा आदी गायन कलपथकाच्या वतीने भीम गीते सादर करून अभिवादन करण्यात आले.

दरम्यान शहरातील नो चॅलेंज ग्रूप, सारनाथ बौध्द विहार, पंचशील तथागत वाचनालय, समता नगर, दि लॉर्ड बुध्दा चॅरिटेबल ट्रस्ट, एकतानगर, कॉंग्रेस भवन, भिमराष्ट्र ग्रूप, बसस्थानक, ॲटो यूनियन, प्रभात मॉर्निंग ग्रूप, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, काळे प्लॉट, शासकीय, निमशासकीय कार्यालय, शहरातील महाविद्यालय, खाजगी शाळा, जिल्हा परिषद शाळेत प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

ग्रामीण भागात शाळा व ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.भारतीय बौध्द महासभेच्यावतीने आयोजित  सामान्य ज्ञान स्पर्धेतील  विजेत्यांना रोख रक्कम, पुस्तक, पेन व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. महासभा शाखेचे तालुकाध्यक्ष संतोष सुरवसे, शहराध्यक्ष प्रा. संजीव कांबळे तालुका सरचिटणीस किरण कांबळे, शहर सरचिटणीस अविनाश भालेराव आदींनी यासाठी पुढाकार घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com