Droupadi Murmu with Dr Kiran Jharkar National Teacher Award
sakal
- धनंजय शेटे
भूम - ईट गावचे सुपुत्र तथा धाराशिव येथील कै. उद्धवराव दादा पाटील आयटीआय महाविद्यालयात शिल्प निदेशक (कोपा) म्हणून कार्यरत असलेले डॉ. किरण प्रकाश झरकर यांना कौशल्य विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल केंद्र सरकारचा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झरकर यांचा गौरव करण्यात आला. आयटीआय क्षेत्रातील शिक्षकाला राष्ट्रीय पातळीवरील हा सन्मान मिळाल्याने धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.