
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा पावसाच्या दिवसांत घट झाली आहे. गेल्यावर्षी १३ जुलैपर्यंत विभागात सरासरी २९ दिवस पावसाचे होते. यंदा फक्त १६ दिवसच पावसाचे ठरले आहेत. चोवीस तासांत २.५ मिलिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला तर तो पावसाचा दिवस गृहीत धरला जातो. यंदा या पावसाच्या दिवसांत मोठी घट झाली आहे.