
फुलंब्री : फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव पाणीदार आणि सक्षम बनविण्याचे स्वप्न असून ते सत्यात उतरविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन पुणे येथील मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी केले. फुलंब्री तालुक्यातील पाल येथे टाटा मोटर्स व नाम फाउंडेशनच्या सहकार्याने गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ श्री.चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.१८) करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी आमदार अनुराधा चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष सांडू जाधव, आप्पासाहेब काकडे, शिवाजी पाथ्रीकर, योगेश मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना मुख्य अभियंता अतुल चव्हाण म्हणाले की, फुलंब्री विधानसभा मतदारसंघ हा पाणीदार म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला सक्षम बनवण्यावर आपला भर असणार आहे.