crime
Sakal
धाराशिव - शहरातील एसटी कॉलनी (सांजा रोड) येथील ३८ वर्षीय तरुणाने महिलेच्या सततच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पुणे येथील एका महिलेविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.