Travels Accident
sakal
- बाळासाहेब काळे
करमाड - पुण्याहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्स बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलाचा कठडा तोडून सुमारे दहा फूट खोल नालीत कोसळली. छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील समाधान हॉटेलसमोर शनिवारी (ता. १४) पहाटे चारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत साई संजय विघे (वय-२०, रा. कालिकानगर, पिंपळवाडी, ता. शिर्डी, जि. अहिल्यानगर) यांचा मृत्यू झाला, तर २५ प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.