Vittal Garad
sakal
- ज्ञानेश्वर बोरूडे
लोहगाव - पैठण तालुक्यातील शेवता येथील जायकवाडी धरणग्रस्त शेतकरी शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता, वीजपंप सुरू करताना स्टार्टरजवळ विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २८) सायंकाळी उघडकीस आली. विठ्ठल उत्तमराव गरड (वय-५७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.