

Pardi Villagers Appeal to MSEDCL Not to Cut Power Supply Amid Drought as Former Sarpanch Requests Temporary Relief
esakal
‘-बा. पू. गायखर
लोहा: ‘साहेब, दुष्काळाचे संकट मोठे आहे हो! गरिबांना मारू नका. पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरीच्या शोधात भटकावे लागत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम नाही, घरात पैसा नाही. अशा परिस्थितीत गरिबांचा वीजपुरवठा खंडित करू नका,’ अशी आर्त आणि भावनिक विनंती पारडी येथील माजी सरपंच दिगंबर डिकळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली.