Drought Dims Pola Festival Celebrations as Farmers Struggle
sakal
पाचोड - शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा आणि बळीराजाच्या जीवनाशी नाते सांगणारा पोळा सण अवघ्या एका दिवसांवर आला असतानाच पावसाने पाठ फिरवल्याने यंदाच्या पोळ्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाळा आटोपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतशिवार कोरडेठाक पडले असून, रानावनातील हिरवा चारा गायब झाला आहे. एवढेच नव्हे तर वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी आंघोळ घालण्यासाठीही पाणी मिळणे कठीण झाल्याचे चित्र पाचोड (ता.पैठण) परिसरासह तालुक्यात पाहवयास मिळते.