Drought Scorches Kharif Crops Farmers Seek Relief! Guardian Minister Narhari Zirwal Inspects Crop Damage
sakal
हिंगोली - पावसाने पाठ फिरवल्याने सेनगाव तालुक्यातील खरीप हंगाम संकटात सापडला असून, मानसपिंप्री परिसरातील शेतशिवारात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. करपलेल्या पिकांची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी बुधवारी (ता. १६) प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे , माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पावसाची स्थिती, पिकांची वाढ आणि झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.