Gangapur Tehsil Drought
sakal
कायगाव - गंगापूर तालुक्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थितीचे सावट गडद होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेती आणि पशुधनासमोरील संकटाची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. संभाव्य चारा व पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. शुक्रवारी (ता. ९) रोजी जामगाव शिवारात चारा छावण्यांसाठी प्रशासनाने जागेची पाहणी केली.