
केज : मांजरसुंबा येथून अंबाजोगाईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या एका कंटेनरने सात ते आठ वाहनांना धडक दिली. मद्यपी चालकाने रस्त्यावरील वीस ते पंचवीस जणांच्या अंगावर कंटेनर घालण्याचा प्रयत्न केला. यात कंटेनरखाली येऊन एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले आहेत.