Beed Crime: मद्यधुंद चालक-वाहकांनी दामटली बस; बीडजवळ प्रकार उघडकीस, प्रवाशांची घाबरगुंडी, गुन्हा नोंद
Drunk Driving: पंढरपूर–अकोट रस्त्यावर दारूच्या नशेत बस चालवणाऱ्या चालक-वाहकामुळे प्रवाशांची भीती पसरली. त्यांनी नातेवाइकांना फोन करून मध्यवर्ती एसटी कार्यालयापर्यंत माहिती पोहोचवली आणि पोलिसांनी दोघांना अटक केली.
बीड : दारूच्या नशेतील चालक-वाहक ‘पंढरपूर-अकोट’ बस दामटवत असल्याचे लक्षात येताच प्रवाशांची एकच घाबरगुंडी उडाली. त्यात काहींनी फोनाफानी करून नातेवाइकांना माहिती दिल्यानंतर हे प्रकरण मुंबईतील एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयापर्यंत पोचले.