

Drunk RPF Jawan Faces Public Anger at Parli Railway Station After Alleged Harassment of Woman Passenger
sakal
परळी वैजनाथ : येथील रेल्वेस्थानकात मद्यधुंद अवस्थेत कर्तव्यावर असलेल्या आरपीएफच्या जवानाने प्रवासी महिलेची छेड काढल्याचा आरोप झाल्यानंतर संतप्त प्रवाशांनी जवानाला मारहाण केली. प्रवाशांचा संताप वाढल्याने जवानाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची दखल घेत संबंधित जवानावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.