औरंगाबाद : प्राणिसंग्रहालयात मादी बिबट्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

प्राणिसंग्रहालयातील मादी बिबट्या नाझियाचा गुरुवारी (ता. 12) मृत्यू झाला. गेल्या सहा दिवसांपासून ती आजारी होती. वयोवृद्ध झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे संचालक डॉ. बी. एस नाईकवाडे यांनी सांगितले. 

औरंगाबाद - प्राणिसंग्रहालयातील मादी बिबट्या नाझियाचा गुरुवारी (ता. 12) मृत्यू झाला. गेल्या सहा दिवसांपासून ती आजारी होती. वयोवृद्ध झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे संचालक डॉ. बी. एस नाईकवाडे यांनी सांगितले. 

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात तीन बिबटे होते. यातील नाझियाला तीन वर्षाची असताना 2009 मध्ये बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क येथून प्राणिसंग्रहालयात आणले होते. नाझिया गेल्या सहा दिवसांपासून आजारी होती. पशुवैद्यक डॉ. नीती सिंग त्यांच्यावर उपचार करत होत्या. मात्र, ती उपचाराला प्रतिसाद देत नव्हती. गुरुवारी रात्री नाझियाचा मृत्यू झाला. बिबट्याचे सरासरी वय 12 ते 14 असते. नाझियाचे वय 13 वर्षे होते. वयोमानानुसार तिचा मृत्यू झाल्याचे श्री. नाईकवाडे यांनी सांगितले. नाझियाच्या मृत्यूमुळे प्राणिसंग्रहालयात आता राजू आणि रेणू ही जोडी उरली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dying of a leopard in Siddharth zoo at Aurangabad