पाठसांगवी येथील उच्चशिक्षित तरुण बाळासाहेब नाईकिंदे यांनी पदवी घेतल्यानंतर तीन वर्षे बार्शी येथे स्पर्धा परीक्षेची (एमपीएससी) तयारी केली.
भूम : तालुक्यातील पाठसांगवी येथील उच्चशिक्षित तरुणाने नोकरीच्या (Job) पाठीमागे न लागता आधुनिक शेतीची (Modern Agriculture) कास धरीत अडीच एकरांत पेरू पिकातून (Guava Crop) १४ लाखांचे उत्पन्न घेतले आहे. तालुक्यातील पाठसांगवी येथील बाळासाहेब नाईकिंदे यांनी २० जुलै २०२३-२४ मध्ये अडीच एकर क्षेत्रावर होर्टी तैवान या पेरूची लागवड केली. पहिल्या वर्षी त्यांना ३० टन उत्पन्न निघाले, तर दहा लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले.