

Beed News
esakal
बीड: अंबाजोगाई आणि वडवणी तालुक्यातील ग्रामीण भागाला गुरुवारी (ता. १९)विजांच्या कडकडाटासह गारांच्या पावसाने झोडपून काढले. या नैसर्गिक आपत्तीत कुठे वीज पडून हरभऱ्याचा ढीग जळाला, तर कुठे गायीचा मृत्यू झाला. त्यातच शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच एकर ऊस खाक झाल्याने बळीराजा पूर्णपणे हतबल झाला आहे.