Dharashiv Crime News : दोन घरफोड्या; दहा लाखांचा मुद्देमाल चोरीला

डोळ्यासमोरून तीन चोर पसार, गुन्हा नोंदविण्यासाठी लावले ३० तास
dharashiv
dharashivsakal

ईट भूम : तालुक्यातील डोकेवाडी येथील बळीराम सदाशिव आहेर व अर्जुन सदाशिव आहेर यांच्या घराचे दिवसा कुलूप तोडून चोरी केल्याची घटना (ता.३) बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास उघडकीस आली. चोरट्यांनी अंदाजे साडेदहा लाख रुपयांची मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संदीप आहेर व वडील ईट या ठिकाणी मुलाची हेअर कटिंगसाठी गेले होते.

घरातील सर्व महिला गावात लग्न समारंभाच्या बांगड्या भरण्यासाठी गेले होते. त्याचे कामे उरकून घरी परत आल्यानंतर दारात नवीन बिना नंबरची युनिकॉर्न गाडी उभी होती. घरी कोणी नाही घर कस उघडले हे पाहण्यासाठी ते घरात शिरले असता तीन अज्ञात व्यक्ती घरातून धारदार चाकू व बॅट घेऊन बाहेर आले. यावेळी त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

परंतु त्यांना हुलकावणी देऊन होंडा युनिकॉर्न गाडीवर बसून ते ईटच्या दिशेने पळून गेले. त्यामुळे आहेर यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. या दोन भावाच्या घरातून चोरट्यांनी २७ तोळे सोने व ३ लाख ८७ हजार ५०० रुपये असे अंदाजे १० लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेचा वाशी पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आर.बी.घुले करीत आहेत.

dharashiv
Dharashiv : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १० जानेवारीला तर उपमुख्यमंत्री अजित पवार १३ जानेवारीला जिल्हा दौऱ्यावर

हा ‍मुद्देमाल घेऊन चोरट्याचा पोबारा

सोन्याचे गंठण ३ तोळे, सोन्याच्या १ टोळ्याच्या ४ अंगठा सोन्याच्या ५ ग्रॅम वजनाच्या ३ अंगठ्या सोन्याचे झुंबर, जोडी ८ ग्रॅम सोन्याचे ठुशी ४ ग्रॅम सोन्याचे झुमके ८ ग्रॅम, वेलजोडे दोन ग्रॅम एकूण ११ तोळे ५ ग्रॅम. रोख २,३८, ५०० सर्व ५०० च्या नोटा दोन्ही भावाचे मिळून २७ तोळे व रोख रक्कम ३,८७, ५०० असं एकूण १० लाख ६२ हजार ५०० रुपये घेवून चोरट्यांनी पोबारा केला आहे.

असं गेलं सोने चोरी

बळीराम आहेर यांच्या घरातील सोन्याच्या अंगठ्या एक तोळ्यांच्या चार व ५ ग्रॅम असं, ४ तोळे ७.५ ग्रॅम , सोन्याचे पट्टी गंठण तीन तोळे, २ ग्रॅम, साखळी गंठण ३ तोळे, ६ ग्रॅम,दोन सोन्याचे मिनी गंठन २ तोळे, सोन्याचे झुमके, ७ ग्रॅम सोन्याचे ठुसे ,३ ग्रॅम , १ तोळा सोन्याचे लॉकेट ५ ग्रॅम, एकूण १५ तोळे ५ ग्रॅम रोख रक्कम १४,९००० रुपये काही नोटा ५००,२००, १०० असा होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com