सिल्लोडमध्ये ईद साजरी

सचिन चाेबे
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

शहरात बकरी ईद सोमवारी (ता. 12) शांततेत साजरी करण्यात आली. येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक प्रार्थना केली.

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : शहरात बकरी ईद सोमवारी (ता. 12) शांततेत साजरी करण्यात आली. येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक प्रार्थना केली.

यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांना शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे, नायब तहसीलदार संजय सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, नगरसेवक राजेंद्र गौर, अकिल वसईकर, हाजी मोहम्मद हनिफ यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eid celebrate in sillod