Latur Crime : चिमुकल्यास अवैधपणे दिले दत्तक; उदगीर शहरातील प्रकार, वकिलासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Illegal Adoption : उदगीरमधील इंदिरानगर येथे १८ महिन्याच्या बालकाला बेकायदेशीरपणे शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर दत्तक देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी वकिलासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर (लातूर) : शहरातील इंदिरानगरात १८ महिन्यांच्या मुलास शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर अवैधपणे दत्तक दिल्याप्रकरणी बुधवारी (ता. २८) रात्री उशिरा वकिलासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.