लोअर दूधना प्रकल्प धरणाचे आठ दरवाजे उघडले

दूधना नदिपात्रात १७,३२८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
लोअर दूधना प्रकल्प
लोअर दूधना प्रकल्पsakal

सेलू (जि.परभणी) : तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्प धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरण शंभर टक्के भरले आहे.बुधवारी (ता.२२) रोजी दूपारी दोन वाजता धरणाचे आठ दरवाजे ०.६० मिटरने उचलले असुन दूधना नदीपात्रात

१७,३२८ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.धरण सुत्रांच्यावतिने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लोअर दूधना प्रकल्प
...म्हणून मागासवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा - तायवडे

तालुक्यातील लोअर दूधना प्रकल्प धरण शंभर टक्के क्षमतेने भरले असून पाण्याची आवक बघता मंगळवारी प्रकल्पाचे द्वार क्र.१, २ , ३ , ४ , १७ , १८ , १९ व २० हे आठ दरवाजे ०.६० मीटरने २,१६६ ०८ = १७,३२८ क्यूसेक्सने दूधना नदि पात्रात विसर्ग बुधवारी दूपारी दोनच्या सुमारास सोडण्यात आला आहे.दरम्यान मागच्या पाच ते सहा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. कुठे मध्यम तर कुठे जोरदार पाऊस पडत आहे.मंगळवारी ( ता.२१ ) रोजी धरणाच्या लाभक्षेत्रात मुसळधार पाऊस झाला होता.त्यामुळे धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे.पुढील दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे, कमी करणे बाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे धरण सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

वाहतूक ठप्प...

मंगळवारी लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरण शंभर टक्के इतके भरल्याने बुधवारी धरणाची आठ दरवाजे उघडून १७,३२८ क्युसेसने दूधना नदि पात्रात विसर्ग करण्यात येत आहे.त्यामुळे त्या मर्गावरिल सेलू—देवगाव (फाटा), राजवाडी—वालूर हे रस्ते वाहतूकीसाठी बंद झाली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com