
गांज्याची शेती करणार्या दोघा शेतकर्यांना ताब्यात घेत शेतीतून लागवड केलेल्या सुमारे 170 किलो वजनाच्या व अंदाजे आठ लाख 60 हजार रुपये किंमतीची गांजाची झाडे जप्त.
गंगाखेड (जिल्हा परभणी): तालुक्यात डोंगरजवळा शिवारात स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाच्या पथकाने गांज्याची शेती करणार्या दोघा शेतकर्यांना ताब्यात घेत शेतीतून लागवड केलेल्या सुमारे 170 किलो वजनाच्या व अंदाजे आठ लाख 60 हजार रुपये किंमतीची गांजाची झाडे जप्त केल्याची घटना (ता. 6) नोव्हेंबर रोजी घडली.
जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचार्यांना अवैंध व्यवसायाविरूध्द कठोर कारवाईचे आदेश बजावल्या नुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना पेट्रोलिंग दरम्यान पिंपळदरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे डोंगरजवळा शिवारात नाथराव देवराव मुंडे हे विनापरवाना गांज्याची झाडांची लागवड करीत तो गांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार (ता.6) नोवेंबर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गट क्र. 64 व 65 मध्ये छापा टाकत लागवड केलेल्या पिकांची पाहणी केली असता कापूस व तुरीत अंतरपीक म्हणून दोन शेतकर्याने गांजाच्या झाडाची लागवड केली. गट नं.64 मध्ये एकूण 25 हिरवी व तीन वाळलेली झाडे आढळून आली. या शेताच्या पश्रि्चमेस गट नं. 65 मध्येही कापूस व तुरीच्या पिकात 21 हिरवी व पाच वाळलेली गांज्याची झाडे पथकाने जप्त केली. यात अंदाजे दोन लाख 80 हजार रुपयांची अंदाजे 600 ग्रॅम वजनाची, गांज्यांची बोंडे आलेली उग्रट वासाची हिरवारी झाडे, अंदाजे चार लाख रुपयांची 21 हिरवीगार बोंडे असलेली उग्रट वासाची गांज्याची झाडे व्यापाराच्या उद्देशाने लागवड केलेली अंदाजे वजन 80 किलो, 19 हजार रुपयांची अंदाजे एक किलो 900 ग्रॅम वजनाचे पाच वाळून गेलेली झाडे, असा एकूण सात लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
हेही वाचा - दूर्दैवी घटना : पती- पत्नीच्या पन्नास वर्षांचा प्रवास एकाच दिवशी संपला, परिसरात हळहळ -
सत्याचबरोबर शेजारी असलेल्या दगडीराम देवराव मुंडे यांच्याही शेताची पाहणी केली असता तेथेही कापूस व तुरीच्या झाडामध्ये गांज्याची शेती घेत असल्याचे दिसून आले. तेथे गांज्याची 35 झाडे उग्रट वासाची हिरवीगार व्यापाराच्या उद्देशाने लागवड केलेली पथकास आढळली. एक लाख 55 हजार रुपये अंदाजे किंमतीची एक किली ग्रॅम वजनाची झाडे पथकाने जप्त केली.
या पथकाने 138.5 किलोग्रॅम वजनाची सात लाख 50 हजार रुपयांची तर 31 किलो वजनाची एक लाख 55 हजार रुपयांची झाडे नाथराव देवराव मुंडे व दगडीराम देवराव मुंडे यांच्या शेतात आढळून आल्यामुळे पिंपळदरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन दोन्ही आरोपींना (ता.7) नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता सदरील आरोपींना न्यायलयाने न्यायालयीन कोठडी सुनावली .सदरील कार्यवाहीत सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद विपट, फौजदार किशोर नाईक, पोलिस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, मधुकर चट्टे, हनुमंत जक्केवाड, बाळासाहेब तुपसमुंदरे, जमीर फारोकी, शंकर गायकवाड, शेख अजहर शेख, सय्यद मोईन, किशोर चव्हाण, अरुण कांबळे, घुगे,शिंदे आदि सहभाग घेतला.
संपादन - प्रल्हाद कांबळे