Eknath Shinde : ‘अवकाळी’ नुकसानीचे पंचनामे करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना; शेतकऱ्यांना दिलासा
Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पावसाच्या नुकसानीसंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे. तातडीने पंचनामे होतील.