माजलगाव : बँकेतून पैसे काढून घरी पायी जात असताना एका वृद्धाच्या हातातील एक लाख रुपये दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी हिसका देऊन लंपास केल्याची घटना शुक्रवारी (ता. ७) भरदुपारी घडली. याप्रकरणी शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..शहरालगत असलेल्या सिंदफणा नगरी येथील रहिवासी सेवानिवृत्त कर्मचारी पंडित तात्यादेव जोशी हे शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास शहरात आले. त्यांनी बसस्थानकासमोरील एसबीआय बँक शाखेतून एक लाख रुपये काढले. एका पिशवीत पैसे गुंडाळून ते बाहेर पडले..त्यांनी काही फळे आणि किराणा साहित्याची खरेदी केली. त्यानंतर ते पायी आपल्या घरी फुले पिंपळगाव रोडने जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून घेतली व पळ काढला..Parli News : अखेर गोरक्षकांचे उपोषण मागे; हिंदू बांधवांच्या मूक मोर्चानंतर अवैध कत्तलखाना सील.या घटनेनंतर पंडित जोशी यांनी शहर ठाण्यात तक्रार दाखल केली असून सीसीटीव्हीद्वारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.