Monkey Attack : वृद्ध महिलेवर वानराचा प्राणघातक हल्ला; कन्नड तालुक्यातील गव्हाली येथील घटना

घरासमोरील अंगणात खाटेवर झोपलेल्या एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर वानराने प्राणघातक हल्ला केल्याची थरारक घटना घडली.
Hirabai Pawar

Hirabai Pawar

sakal

Updated on

कन्नड - तालुक्यातील गव्हाली येथे घरासमोरील अंगणात खाटेवर झोपलेल्या एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर वानराने प्राणघातक हल्ला केल्याची थरारक घटना गुरुवारी (ता. २८) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. हिराबाई नारायण पवार (वय-६५, रा. तलवाडा, ता. वैजापूर) असे वानराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com