Latur Accident: कारने फरफटत नेलेल्या महिलेचा दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह; जळकोट तालुक्यामध्ये मुलासमोर घटना
Accident News: जळकोट, लातूर जिल्ह्यात मुलासमोरच भरधाव कारने ७० वर्षीय चिमणाबाई बाचीपळे यांना उडवून मारले. कारचा पाठलाग करणारा मुलगा रात्री शोध घेतल्यावर सकाळी आईचा मृतदेह सापडला.
जळकोट (जि. लातूर) : मुलासमोरच भरधाव कारने आईला दिग्रस- पाटोदा खु. (ता. जळगोट) सुमारे १५ किलोमीटर फरफटत नेले. कारचा पाठलाग, रात्री दोनपर्यंत शोध घेणाऱ्या मुलाला रविवारी (ता. २४) सकाळी आईचा मृतदेह पाहायला मिळाला.