

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या. महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजनसह अपक्ष उमेदवारांनी मुख्य रस्त्यांसह शहरातील गल्लीबोळातून वाहनफेऱ्या, प्रचारफेऱ्या काढत, बैठका घेत प्रचाराची सांगता केली. बुधवारी मतदान होणार असून, त्यासाठी अवघ्या २४ तासांचा वेळ उरल्यामुळे प्रत्यक्षात मतदान आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी उमेदवारांच्या जोर-बैठका सुरू आहेत. सोमवार, मंगळवारची (ता. १९) रात्र उमेदवारांसाठी वैऱ्याची ठरणार आहे.