Vidhan Sabha 2019 : '30-35 दिवसांत निवडणूक संपेल; दिवाळी अगोदर मतदान'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

बीड : या आठवड्यात निवडणुक कार्यक्रम जाहीर होईल. ३० ते ३५ दिवसांत निवडणुक कार्यक्रम संपेल आणि दिवाळीच्या अगोदर मतदान होईल, असा अंदाज जेष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. 

पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १८) राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. श्री. पवार म्हणाले, या आठवड्यात निवडणुक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. कार्यकर्ते व तरुणांना भेटण्यासाठी आपण बाहेर पडलो असल्याचेही शरद पवार म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीत निम्मेअधिक तरुणांना संधी दिली जाईल. बीडमध्येही तरुण आणि जेष्ठांचा मिलाप केला जाईल असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जिल्ह्यातील आष्टी वगळता पाच मतदार संघातील उमेदवार जाहीर करुन टाकले.

परळीतून धनंजय मुंडे, माजलगावमधून प्रकाश सोळंके, गेवराईतून विजयसिंह पंडित, केजमधून नमिता मुंदडा व बीडमधून संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीवर श्री. पवार यांनी शिक्कामोर्तब केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elections will end in 30-35 days; Voting before Diwali