

Beed News
esakal
बीड: बीडच्या गल्लीबोळांत एरवी शांतता असते, पण आज चित्र वेगळे आहे. घरासमोर महावितरणची गाडी थांबते, अधिकारी खाली उतरतात आणि थेट वीज मीटरकडे कूच करतात. साहेब, बिल भरतो की उद्या, अशी विनवणी ग्राहकाकडून येते, पण नियमांचे पक्के अधिकारी आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.
आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना (मार्च) असल्याने महावितरणने आता बीड शहरासह जिल्ह्यात वसुलीचा धडाका लावला आहे. थकबाकीचा डोंगर इतका वाढला आहे की, आता केवळ वायर कापून भागणार नाही, तर चक्क मीटर खेचून नेण्याची कडक कारवाई प्रशासनाने हाती घेतली आहे.